Share

केंद्रीय मंत्रीपदावरून हटवल्यामुळे भाजपच्या ‘या’ नेत्याने ठोकला राजकारणाला रामराम !

Published On: 

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून दुसऱ्यांदा माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार असणारे बाबुल सुप्रियो राजकारणातून निवृत्त झाले आहेत. त्यांनी शनिवारी सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहून राजकारण सोडण्याची घोषणा केली. ते म्हणाले की 1 महिन्याच्या आत मी खासदार पदाचा राजीनामा देईन आणि मला मिळालेले शासकीय घर रिकामे करेन. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान मोदी सरकारच्या विस्तारात सुप्रियो यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे ते नाराज होते. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा आहे. बाबुल सुप्रियो यांनी फेसबुकवरून ही घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या आहेत. सामाजिक कार्य करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षात राहण्याची आवश्यकता नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. अलविदा, मी कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. टीएमसी, काँग्रेस, सीपीआयएम या पैकी मला कुणीच बोलावलं नाही. मी कुठेच जात नाही. सामाजिक कार्य करण्यासाठी राजकीय पक्षाची गरजच नाही, असं सुप्रियो यांनी म्हटले आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसापासून बाबुल सुप्रियो भाजपमध्ये फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांच्याबाबत अनेक प्रश्न केले जात होते. ते काही तरी मोठा निर्णय घेतील असं बोललं जात होतं. त्यांनी फेसबुक पोस्टवरून त्यांच्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. पक्षासोबत आपले काही मतभेद होते. निवडणुकीपूर्वीच या गोष्टी सर्वांच्या समोर उघड झाल्या होत्या. पराभवाची मीही जबाबदारी घेत आहे. परंतु, त्याला दुसरे नेतेही जबाबदार आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!