Share

२० टक्के रुग्ण आढळल्यास संबंधित भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र

Published On: 

पुणे : जगात आणि आता त्यानंतर देशात कोरोनाची संख्या वाढत आहे. राज्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 3 हजार 890 रुग्ण आढळून आले आहे. याचा पाश्ववभूमीवर पुण्यामध्ये आता एखाद्या भागात २० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संबंधित भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दाट लोकवस्ती किंवा झोपडपट्टीपेक्षाही गृहनिर्माण सोसायटय़ांमधील रुग्णांची संख्या शहरात वाढत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेत प्रतिबंधित क्षेत्राबाहेर रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढत आहे. जिल्हा प्रशासन, शहर पोलीस यंत्रणा, महापालिका प्रशासनाने शहरातील कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेतल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली आहे.

दरम्यान, ‘प्रतिबंधित क्षेत्रांचा दर १५ दिवसांनी घेण्यात येणारा आढावा दर आठ दिवसांनी घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार दर शुक्रवारी आढावा घेऊन प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर केली जाणार आहेत. त्यामध्ये एखादा भाग, सोसायटी या ठिकाणी २० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण असल्यास तेवढाच भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला जाणार आहे. जेणेकरून संबंधित भागाच्या आजूबाजूच्या भागातील व्यवहारांवर त्याचा परिणाम होणार नाही.

१७ जून रोजी घेतलेल्या आढाव्यानुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेर ४० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये दाट लोकवस्ती, झोपडपट्टीसह सोसायटय़ांचाही समावेश आहे,’ असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. तर पोलीस आयुक्त डॉ. के . वेंकटेशम यांच्या आदेशानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील गृहनिर्माण सोसायटय़ांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसृत करण्यात आल्या आहेत.

सावधान ! कोरोना बळावतोय, देशात आणि राज्यात रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ

#coronavirus : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६५ हजारांवर

मुंबईत कोरोनाचा हाहाकार; शिवसेनाभवन पुढील काही दिवस बंद राहणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!