Share

माझा मुलगा तेथे असल्याचा पुरावा मिळाला तर मी राजीनामा देईन; भाजप मंत्र्याचे स्पष्टीकरण

Published On: 

लखीमपूर : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आरोपी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा अशिष विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र माझा मुलगा आशिष मिश्रा घटना घडली तेव्हा घटनास्थळी नव्हता, असा दावा केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांनी केला आहे. तसेच तो तीथे उपस्थित असल्याचे पुरावे दिल्यास मी पदाचा राजीनामा देईन असे स्पष्टीकरणही अजय मिश्रा यांनी दिले आहे.

उत्तर प्रदेशामधील लखीमपूर खेरी येथे रविवारी शेतकऱ्यांसह ९ जणांना चिरडल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून चिरडण्यात आले. त्यानंतर काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्षासह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक प्रतिक्रिया नोंदवली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने हा पराक्रम केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथे सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. उत्तर प्रदेश सरकारने मृत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना ४५ लाख रुपये आणि सरकारी नोकरी व जखमींना १० लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच या घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीत चौकशीचेही अश्वासन दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!