Share

‘चाकणकरांना मी महत्व देत नाही, थोबाड सगळ्यांना रंगवता येत’; दरेकरांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : काल शिरुरमध्ये विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी केलेल्या भाषणादरम्यान दरेकर बोलता बोलता भलतंच बोलून गेले. राष्ट्रवादी रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. ज्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.

प्रवीण दरेकर यांच्या या विधानावर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपली चाकणकर यांनी चांगलाच घणाघात केला होता. यावेळी त्यांनी महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो असा इशारा दिला होता त्यावर दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

यावर बोलताना दरेकर म्हणाले कि, ‘थोबाड सर्वांना रंगवता येतं त्यामुळे अशाप्रकराचे अतिरेकी भाषण करणे योग्य नाही. माझं नीट वक्तव्य समजून घेण्याची आवश्यकता आहे. वड्याचं तेल वांग्यावर काढायचं आणि प्रसार माध्यंमात काहीतरी पाहिजे म्हणून असं काही बोलेले की आपल्याला प्रसिध्दी मिळते.’ अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

प्रविण दरेकर म्हणाले की, मी काही त्यांना महत्व देत नाही, थोबाड सर्वांना रंगवता येतं त्यामुळे अशाप्रकराचे अतिरेकी भाषण करणे योग्य नाही. माझं नीट वक्तव्य समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी असं सांगितलं की, भारतीय जनता पार्टी उपेक्षासांठी, गरिबांसाठी, कष्ठकऱ्यांसाठी, श्रमीकांसाठी काम करते. ते समाजातला शेवटचा जो घटक आहे. त्याला मदत त्याठिकाणी करत असतील. आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष धनदाडंग्यांसाठी, प्रस्तापितासांठी मोठ्यांसाठी काम करतो. आणि अशाप्रकारे रंगलेल्या गालाचे मुके घेण्याऱ्या प्रवृत्तीबद्दल मी बोललो होतो.

असा काही कुठल्या महिलेचा त्यामध्ये संबंध नाही. बोलायचा काही विषय पण नाही. कारण त्यामुळे वड्याचं तेल वांग्यावर काढायचं आणि प्रसार माध्यंमात काहीतरी पाहिजे मग असं काही बोलेले की आपल्याला प्रसिध्दी मिळते. असे काही लोकं आहेत. त्यांला मी फारसं महत्व देत नाही. अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी रुपाली चाकणकरांच्या इशाऱ्यानंतर दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!