Share

आता माझी कुठलेही पद घेण्याची इच्छा नाही : एकनाथ खडसे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांना संधी मिळेल असे वाटत होते. मात्र तसे काही झाली नाही. त्यावर खडसे यांनी आज भाष्य केले. भाजपची राजकारणातील घोडदौड पाहून अनेक लोक आता भाजपकडे येत आहेत. अशा नवीन येणाऱ्या लोकांना संधी दिल्याने पक्षाचे भविष्यकालिन महत्त्व वाढते. त्यामुळे आपली यापुढे कोणतेही पद घेण्याची इच्छा नाही, असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

खडसे बोदवड येथे आले होते. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला का डावलले याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, पक्षात नवीन मंडळी येत आहे. त्यामुळे पक्ष वाढत आहे. त्यांना संधी दिल्याने पक्षाचे भविष्य वाढत आहे. सध्या पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळत आहे. मात्र आता पद घेण्याची इच्छा नसल्याचे सांगत याबाबत नाराजी नसल्याचे सांगितले. यापुढे ही पक्षाचे काम करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप नेते एकनाथ खडसे यांची पुन्हा एकदा वर्णी लागेल असा अंदाज वर्तवला जात होता.

तसेच खडसे यांना देखील मंत्री पदाची अपेक्षा होती. पण तसे काही न होता मंत्रिपदाची माळ युती सरकारने आयात नेत्यांच्या गळ्यात टाकली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नाराजी व्यक्त केली होती, असे वृत्त आले होते.

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!