Share

‘मी तोच आहे…’ रणवीर सिंहने सांगितला ‘बाजीराव मस्तानी’च्या सेटवरचा थरारक अनुभव

Published On: 

मुंबई: बॉलीवूडचा सुपरहिट अभिनेता रणवीर सिंहने स्वताच्या अभिनयाच्या जोरावर स्थान निर्माण केल आहे. त्याच्या ऐतिहासिक भूमिका लोकांच्या मनात उतरल्या आहेत. त्याच्या अंदाज आणि स्टाईल मुळे तरुण वर्गाचा धिक आवडीचा अभिनेता ठरला आहे. रणवीर सिंहच्या ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमामधील काही भयानक अनुभव त्याने सांगितले आहे. ज्यामुळे तो देखील चांगलाच घाबरला होता.

रणवीर सिंहने एका मुलाखतीत ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमाच्या सेटवर त्याला भूत दिसल्याचा दावा केला होता. ते दुसरं तिसरं कुणी नसून बाजीराव पेशवे यांची आत्मा असल्याचं त्याचे म्हणणे होते.
याबाबत रणवीर म्हणाली की, ‘मी कधीच आत्मा आणि भूत यावर विश्वास ठेवत नव्हतो. मात्र त्या दिवसापासून मी खूप घाबरलो होतो. माझ्यासाठी शूटिंगचे ते सर्वात कठीण दिवस होते. पण माझ्या आजुबाजूला सतत कुणी तरी असल्याचं मला जाणवत होतं. ते बाजीराव असल्यासारखं मला जाणवतं होतं.

पुढे तो म्हणाला की, ‘मी सतत विचार करत होतो की जर मला खरचं बाजीराव पेशवे यांची आत्मा दिसली तर… मला माहित नाही मी असा विचार का करत होतो. पण काही दिवसातच हे प्रत्यक्षात घडलं. माझ्या कानात कुणीतरी मी तोच आहे असं कुजबुजल्याचं मला जाणवलं, असा एक भयानक किस्सा त्याने सांगितला आहे.’

तर त्याने बाजीराव पेशव्यांची हुबेहुब आकृती देखील पाहायला असल्याचा खुलासा केला आहे. ‘एक दिवस सेटवर मला मोठा टास्क देण्यात आला होता. हा टास्क उत्तमपणे पार पडावा यासाठी मी प्रार्थना करत होतो. सेटवर तिथेच एक काळ्या रंगाची भिंत होती. या भिंतीवर पांढरी धूळ जमा झाल्याने एक आकृती तयार झाली होती. ती हुबेहुब बाजीराव पेशव्यांची आकृती होती, तिच पगडी, तेच डोळे, मिश्या तोच रुबाब…’ हा अनुभव सांगताना रणवीर म्हणाला की सेटवर त्याने ही आकृती अनेकांनी दाखवली. तेथील अनेकांनी ती आकृती बाजीराव पेशव्यांसारखीच दिसत असल्याचंही म्हंटल होत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!