Share

ह्युंदायने लाँच केली सिंगल चार्जवर धावणारी कार जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Published On: 

मुंबई : आता प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. या पार्श्वभूमीवर 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. सुरुवातीला इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे या कार खरेदि केल्या जात नव्हत्या मात्र आता , कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत.

दरम्यान, ह्युंदाय कंपनी भारतात अनेक इलेक्ट्रिक वाहनं लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. कंपनी त्यासाठी तब्बल 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दक्षिण कोरियाई ऑटोमेकर कंपनी ह्युंदाय मोटर्सने मंगळवारी (23 फेब्रुवारी) त्यांची मिड-साइज क्रॉसओव्हर आयोनिक 5 लाँच केली आहे. या कारच्या जोरावर ह्युंदाय कंपनी 2025 पर्यंत टॉप 3 ग्लोबल इलेक्ट्रिक व्हीकल मेकर्स लिस्टमध्ये स्थान मिळवण्याच्या तयारीत आहे. ह्युंदायने याबाबत म्हटले आहे की, हे मॉडल नवीन इलेक्ट्रिक व्हीकल-ओन्ली प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे जे स्वतःच्या बॅटरी मॉड्यूल टेक्नोलॉजीचा वापर करतं. तसेच यामध्ये सध्याच्या इलेक्ट्रिक कार्सपेक्षा कमी कम्पोनंट्सची आवश्यकता आहे. त्यामुळेच कमी किंमतीत या कारचं प्रोडक्शन केलं जाऊ शकतं.

ह्युंदाय आयोनिक 5 या कारमध्ये जास्तीत जास्त 480 किलोमीटर (298 मैल) पर्यंत ड्रायव्हिंग रेंज मिळेल जी कोना EV पेक्षा 20 टक्क्यांनी अधिक आहे. यापूर्वी Kona EV ही ह्युंदायची सर्वात जास्त रेंज देणारी कार होती. आयोनिक 5 या कारमध्ये तुम्हाला दोन बॅटरी पॅक मिळतील. ज्यामध्ये 58kWh किंवा 72.6kWh चा समावेश आहे. कंपनीने म्हटलंय की, काही ठराविक ठिकाणी या वर्षीच्या पहिल्या सहामाहीमध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध होईल. आयोनिक 5 च्या केबिनमध्ये डॅशबोर्ड, स्विच, स्टीयरिंग व्हील आणि डोर पॅनल पॉलीयूरीथेन बायो पेंटने पेंट केलं आहे. ही कार लांब व्हीलबेस आणि फ्लॅट फ्लोरला सपोर्ट करते. या कारच्या पुढच्या सीट्ससाठी आणि डॅशच्या ओव्हरहेड शॉटमध्ये दोन स्क्रीन्स, इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि इन्फोटेन्मेंट सिस्टिम दिली आहे. यासोबतच आयोनिक 5 च्या टू-स्पोक स्टीयरिंग व्हीलच्या उजव्या बाजूला एक फिजिकल ड्राइव्ह स्टॉल्क दिला आहे.

सरकारी इन्सेंटिव्हज न जोडता या कारची सुरुवातीची किंमत 42,000 युरो (51,100 डॉलर) असू शकते. याचा अर्थ भारतात या कारची किंमत 36 लाख 96 हजार रुपयांच्या आसपास असू शकते. कंपनी पुढील वर्षापर्यंत या कारच्या 100000 युनिट्स विक्रीचं प्लॅनिंग करत आहे. यापैकी 30 ते 40 टक्के वाहनं युरोपात, 30 टक्के वाहनं उत्तर अमेरिकेत आणि 20 टक्के वाहन दक्षिण कोरियामध्ये विकली जातील, असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!