🕒 1 min read
मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी(Atal Bihar Vajpayee) यांची काल(२५ डिसें.)जयंती होती. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाने निधी उभा करण्यासाठी ‘माइक्रो डोनेशन अभियान’सुरु केले आहे. हे अभियान ११ फेब्रुवारी २०२२ पर्यंत राबवले जाणार आहे. दरम्यान, विविध कारणांमुळे हे अभियान चर्चेचा विषय ठरला आहे.
याला अनुसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी स्वपक्षाला दिलेल्या देणगीच्या पावतीचा एक फोटो ट्विट केला. तसेच हा फोटो ट्विट करत ते म्हणाले की, राष्ट्रहित हे भाजपचे प्रथम प्राधान्य आहे. त्याला अनुसरूनच भाजप पुढे वाटचाल करत आहे. भाजपचे कार्यकर्ते हे आयुष्यभर निस्वार्थी सेवेने आपले योगदान देत आहेत. तुमचं एक छोटंसं दान किंवा देणगी भाजप कार्यकर्त्यांच्या सेवाकार्याला बळकटी देण्याचे मोलाचे काम करु शकते. भारतीय जनता पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी तसंच देशाला भक्कम बनवण्यास भाजपला मदत करण्यासाठी योगद्यान द्यावे’, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
I have donated Rs. 1,000 towards the party fund of the Bharatiya Janata Party.
Our ideal of always putting Nation First and the culture of lifelong selfless service by our cadre will be further strengthened by your micro donation.
Help make BJP strong. Help make India strong. pic.twitter.com/ENdytJYEj5
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2021
याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे(Rupali Patil Thombare) यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,’भाजपला एक हजार रुपये देणगी दिल्याने, देश कसा मजबूत होईल ? यावर एक तज्ञ समिती नेमायला हवी का? यह पब्लिक है, सब जानती है. ज्यांच्या पक्षाची अर्थव्यवस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यवस्था कशी मजबूत करतील?’, असा सवालही त्यांनी केला आहे.
भाजपाला एक हजार रुपये देणगी दिल्याने, देश कसा मजबूत होईल ? यावर एक तज्ञ समिती नेमायला हवी का? यह पब्लिक है, सब जानती है.
ज्याच्या पक्षाची अर्थव्यस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यस्था कशी मजबूत करतील?— Rupali patil thombare (@Rupalispeak) December 26, 2021
दरम्यान, पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी, चंद्रकांत पाटील यांनीही देणगी दिली असून देशातील वेगवेगळे कार्यकर्ते या देणगी अभियानाशी जोडले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- “स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे तोऱ्यात वावरत आहेत”, राऊतांचा राेखठोकमधून मोदींवर प्रहार
- “लोकसभेच्या गॅलरीतून डोकावणारे पत्रकार ही लोकशाहीची खरी…”, लोकसभेत पत्रकार बंदीवर राऊतांची टीका
- मंदिर बांधून देऊ म्हणणाऱ्यांनी ७०० शेतकऱ्यांचे बळी घेतले-खा. संजय राऊत
- पंतप्रधान मोदींची घोषणा; ‘या’ तारखेपासून सुरु होणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
- पंतप्रधान मोदींची घोषणा; ‘या’ तारखेपासून सुरु होणार १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
