Share

घाबरायचं काहीच कारण नाही! जितेंद्र आव्हाड आता एकदम ठणठणीत

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची वार्ता आली होती. तर आज या बातमीला दुजोरा मिळाला आहे. जितेंद्र आव्हाड यांना श्वास घेण्यास काहीसा त्रास होत असल्याने स्वतः ते रुग्णालयात दाखल झाले होते.

सध्या जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती स्थिर असून ते आता ठणठणीत असल्याची माहिती आव्हाडांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. ते म्हणाले की, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आव्हाड यांनी स्वतःला रुग्णालयात दाखल करून घेतले. मात्र आता ते उत्तम आहेत.

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले जितेंद्र आव्हाड हे काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यानंतर ते होम क्वारंटाइन झाले होते. मंगळवारी रात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज दिवसभर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष संजय ओक हे आव्हाड यांच्या तब्येतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

जितेंद्र आव्हाड यांना मंगळवारी रात्री प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यामुळे सुरुवातीला ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल आणि त्यानंतर मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आव्हाड यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळते.

‘या’ कायद्याचं पालन केलं नाही तर, कायद्यापलीकडे कोणालाही क्षमा केली जाणार नाही । Jitendra Awhad |

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!