Share

होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा २४ तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल – मोहोळ

Published On: 

पुणे : राज्यातील कोरोना सदृश्य परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून या कोरोनाच्या विळख्यात सर्वसामान्यांसह आता राजकीय नेते देखील अडकू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. तर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

५ दिवसांपूर्वी ताप आल्याने मोहोळ यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. ती पोजीटीव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्या प्रकृतीसाठी सदिच्छा देण्यात येत होत्या. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फील्डवर काम करत असल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं होत. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

दरम्यान, कोरोनाचे कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांनी उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा २४ तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असेल, याचं नक्कीच समाधान आहे, या शब्दांत भावना व्यक्त केल्या.

https://t.co/Q4gV5dSkDP

दरम्यान, काल राज्यातील २१९ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६८७५ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याने एकूण संख्या २ लाख ३० हजार वर गेला आहे. यासोबतच आज ४ हजार ६७ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने एकूण कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा हा १ लाख २७ हजार २५९ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.

धक्कादायक : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण

धक्कादायक : पुण्याच्या महापौरांच्या कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाची लागण

मोठी बातमी : धनुभाऊ दहा दिवसांच्या आत पुन्हा सक्रीय होतील, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!