Share

चंद्रकांतदादा तुमच्या डोक्यामध्ये राजकारण असत अन् माझ्या डोक्यात फक्त शेतकरी – राजू शेट्टी

Published On: 

कोल्हापूर : सध्या राज्यात दुधाला २२ रुपये इतरा दर मिळत आहे. पण, या रकमेतून मूलभूत खर्चाची जुळवाजुळव करत असतानाही शेतकऱ्यांच्या नाकी नऊ येतात. लॉकडाऊन होण्याआधी दुधाला प्रतिलीटर साधारण ३२ रुपये इतका दर मिळत होता. पण याबाबत आता मात्र निषेध होताना दिसत नाही. एकेकाळी दूध उत्पादकांसाठी कायदा हातात घेऊ म्हणाऱ्या राजू शेट्टी यांच्याकडून आता मात्र कोणतीही भूमिका मांडली जात नाही. शेतकऱ्यांचा नेता म्हणवून घेणारे आज आमदारकी मिळणार असे समजताच शांत बसले आहेत. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर केली होती.

या टीकेला आता राजू शेट्टी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. ‘चंद्रकांत दादा तुमच्या डोक्यामध्ये नेहमी राजकारण असत राजकीय हेतूनेच कधी काळी तुम्ही मला विष्णूचा अवतार म्हंटल होत. माझ्या डोक्यात मात्र फक्त शेतकरी आणि शेतकरीच असतो. अस ट्विट करत राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शरसंधान साधलं आहे.

तर दुरीकडे ‘केंद्र सरकारने दहा हजार टन आयातीचा निर्णय घेता क्षणी मी १० जुलै रोजीच ट्वीट करून पंतप्रधानाच्या लक्षात आणून दिल होत. २१ जुलैला मी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करतोय तुम्हाला खरोखर शेतकर्यांचा कळवळा असेल तर या आंदोलनात सामील व्हा’. अस देखील राजू म्हणाले आहेत.

https://twitter.com/rajushetti/status/1284105671332425728?s=20

https://twitter.com/rajushetti/status/1284105783165116417?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!