Share

शासकीय रुग्णालयात २४ तासात दोनदा आग; भंडारा दुर्घटनेनंतरही प्रशासन झोपलेले

Published On: 

परभणी: एक महिन्यापुर्वी भंडारा जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात आग लागली होती. या आगीत ८ नवजात बाळांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आणि जिल्हा रुग्णालयाचे ऑडीट सुरु झाले. पण ऑडीट म्हणजे नुसता दिखावा होता, आरोग्य विभाग अजुनही या प्रकरणाला गांभीर्याने घेत नाही असे दिसत आहे. याची प्रचिती परभणी येथे आली.

परभणी येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात २४ तासात दोन वेळा आगीच्या घटना घडल्या. पहिली घटना ही शनिवारी रात्री १० च्या सुमारास घडली. या घटनेत अपघात विभागाच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली. या मजल्यावर असलेल्या जिन्यात ठेवलेल्या लाकडी सामानास आग लागली होती. तर दुसरी घटना रविवारी दुपारी ४.३० वाजता घडली. यावेळी रुग्णालयाच्या लॉंड्री रुमला आग लागली. सुदैवाने या दोन्ही घटनेत जीवितहानी झाली नाही. आग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली.

२४ तासांत घडलेल्या दोन्ही घटना गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीने तीन दिवसांत चौकशी अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, नानलपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन पाहणी केली.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!