Share

सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी; जिल्ह्यात नाही कोरोनाचा एकही रुग्ण

Published On: 

सोलापूर : जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाने आता महाराष्ट्रात देखील हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. मात्र सोलापुरात काल सायंकाळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.

जिल्ह्यात आत्तापर्यंत 89 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यातील 86 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. यात दिल्लीला जाऊन आलेल्या व्यक्तींचाही समावेश आहे. मात्र इतर तीन जणांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. अशी माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

दरम्यान,काल पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना प्रतिबंधासाठी सोलापुरात प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. बैठकीनंतर ते दुपारी पंढरपूर मार्गे मुंबईला रवाना झाल्याचं वृत्त आहे.

कोरोना संबंधी करण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे अडचणी निर्माण झालेल्या जिल्ह्यातील 4100 कुटुंबांना धान्याचे पाकीट जिल्हा प्रशासनाच्या कडून वाटप करण्यात आले आहे.नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष उपाययोजना देखील करण्यात येत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!