Share

रक्षा खडसे भाजपच्या बैठकीला गैरहजर, गिरीश महाजन म्हणतात…

Published On: 

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपवर नाराज असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर एकूणच उत्तर महराष्ट्रातील भाजपला उतरती कळा लागली आहे. त्यावरच एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर डॅमेज कंट्रोलची चाचपणी करण्यासाठी भाजपच्या जळगाव जिल्हा कोअर कमिटीच्या वतीने तातडीची बैठक आयोजित केली आहे. मात्र या बैठकीला माध्यमांना प्रवेश नाकारला आहे.

भाजपच्या जळगाव जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीसाठी माजी मंत्री गिरीश महाजन, प्रांत संघटन मंत्री विजय पुराणिक, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील आदी नेते उपस्थित आहेत. अस असल तरी देखील एकनाथ खडसेनच्या सुनबाई आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी या बैठकीला दांडी मारली आहे.

दरम्यान, रक्षा खडसे यांच्या गैरहजेरी बाबत भाजपा आमदार गिरीश महाजनांना विचारले असता ते म्हणाले, रक्षा खडसे काल रात्री पक्षाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेल्या आहेत. त्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ नेत्यांना पूर्व कल्पना देखील दिली होती. पक्षाची परवानगी घेऊनच त्या दिल्लीला गेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थिती संदर्भात तर्कवितर्क लढवणे चुकीचे असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

दरम्यान,एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहणार असल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे त्यांच्या मूळगावी कोथळी येथे आल्यानंतर रक्षा खडसे यांनी त्यांचे स्वागत केले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!