टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचा पहिला कल हाती आला आहे.या मतदार संघात महायुतीकडून भाजपचे हरिभाऊ बागडे आणि महाआघाडीकडून काँग्रेसचे डॉ.कल्याण काळे आमने सामने होते. या लढाईत हरिभाऊ बागडे आघाडीवर आहेत.
दरम्यान , राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजप च्या हरिभाऊ बागडे यांनी 73 हजार 294 एवढी मते घेत विजय मिळवला. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस चे कल्याण काळे होते. त्यांना 69 हजार 683 मते मिळाली. आणि त्यांचा 3 हजार 611 मतांनी पराभव झाला. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेस चे अनुराधाताई चव्हाण, चौथ्या स्थानावर शिवसेना चे राजेंद्र ठोंबरे आणि पाचव्या क्रमांकावर अपक्ष चे रमेश दहिहांडे होते.
https://twitter.com/Maha_Desha/status/1187213869762039808?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1187213141861527552?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

