Share

औरंगाबादेत एकाच कुटुंबातील चौघांना डेंग्यू; उपचारांनंतर मनपाची फवारणी!

Published On: 

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांत शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढलेले दिसून येत आहेत. शहरात महापालिकेकडून डेंग्यू प्रतिबंधासाठी मोठ्या प्रमाणावर वॉर्डावॉर्डात फवारणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात ऑन फिल्ड अनेक ठिकाणी वेळेवर फवारणी केली गेली नसल्याचे समोर आले आहे. शहरातील अमृत साई प्लाझा सोसायटीमध्ये एकाच कुटुंबातील अनेकांना डेंग्यू होऊन गेल्यानंतर मनपाचे आरोग्य कर्मचारी फवारणीसाठी आल्याचे नागरिकांनी सांगितले.

तीन महिन्यात डेंग्यूच्या साथीने डोके वर काढले आहे. मागील वीस दिवसांतच शहरात तब्बल ४६ जणांच्या चाचणीचे अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू प्रतिबंधासाठी महापालिकेकडून अ‍ॅबेटिंग, फवारणीची विशेष मोहीम राबवली जाते. मात्र ही मोहीम जितक्या प्रभावीपणे राबवायला हवी तितकी प्रभावी दिसून येत नाही. त्यामुळेच यंदाच्या पावसाळ्यात शहरात डासांची उत्पत्ती वाढलेली असून त्यातूनच डेंग्यूसह तापाच्या आजाराचे रुग्ण वाढत असावेत, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्‍त केला आहे.

कुटुंबात ४ पॉझिटिव्ह

शहरातील सिल्कमिल कॉलनीजवळ असलेल्या अमृत प्लाझा सोसायटीत राहणाऱ्या हर्षवर्धन त्रिभुवन यांच्या कुटुंबात चार व्यक्तींना डेंग्यूची लागण झाली. ज्या ठिकाणी तपासणी केली. तेथून त्यांना पत्ता विचारण्यासाठी संपर्क करण्यात आला. दोनदा खात्री करण्यात आली. तपासणी अहवालाची झेरॉक्स प्रत जमा करुन घेण्यात आली. मात्र याआधी त्रिभुवन यांच्या सोसायटीमध्ये फवारणी, अॅबेटिंग कुठल्याही प्रकारची मोहीम मनपाकडून राबविण्यात आलेली नसल्याचे त्यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलतांना सांगितले. पॉझिटीव्ह आल्यानंतर उपचार घेऊन बरे झाल्यानंतर मंगळवारी पालिकेचे पथक त्यांच्या सोसायटीत फवारणीसाठी पोहोचले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!