Share

Health Tips | डेंग्यूमध्ये तुम्ही खात आहात किवी? खाण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

Published On: 

🕒 1 min read

डेंग्यू ताप झाल्यास किवीचा रस किंवा किवी फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय, अनेक प्रकारच्या व्हायरल फिव्हरमध्ये प्लेटलेट काउंट वाढवण्यासाठी किवी खाण्यास सांगितले जाते. किवीमध्ये असलेले गुणधर्म तुमच्यासाठी आरोग्यदायी असू शकतात. किवीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट, अँटी-व्हायरल, अँटी-इन्फेक्शन गुणधर्म असे अनेक गुणधर्म आहेत. याशिवाय, त्यात अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात जसे की व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, रिबोफ्लेविन, बीटा कॅरोटीन इ.

किवीमध्ये असलेला हा गुण तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतो. पण तुम्हाला माहित आहे का की, किवी जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्यालाही हानी पोहोचते. होय, किवीचे जास्त सेवन केल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. याविषयी जाणून घेऊया-

किवी मुळे आरोग्यावर होणारे परिणाम

ऍलर्जी समस्या

जर तुम्ही किवीचे जास्त प्रमाणात सेवन केले तर तुम्हाला ऍलर्जीची तक्रार होऊ शकते. विशेषत: यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, सूज येणे, तोंडात जळजळ होणे, दमा यांसारख्या समस्या होण्याची शक्यता वाढते.

ओरल ऍलर्जी सिंड्रोम

मोठ्या प्रमाणात किवीचे सेवन केल्याने ओरल ऍलर्जी सिंड्रोमचा धोका देखील वाढतो. त्यामुळे तोंडाच्या आत ओठ आणि जिभेला सूज येऊ लागते. या परिस्थितीत, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

किडणीच्या समस्या

किडणीच्या रुग्णांना किवीचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. वास्तविक, किवीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे किडनीशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे किवीचे जास्त सेवन टाळा.

डायरियाच्या समस्या

किवीमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे तुम्हाला डायरियाची समस्या होऊ शकते. त्यामुळे काही लोकांना पोटदुखी, उलट्या, मळमळ यासारख्या तक्रारी पाहायला मिळतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!