टीम महाराष्ट्र देशा : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि तीन वेळा भूमिपूजन झालेला नगर शहरातला उड्डाणपूल लवकरच मार्गी लागेल. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पुलाचे कॉलम उभे राहिलेले दिसतील, अशी माहिती खासदार डॉ़ सुजय विखे यांनी दिली आहे. गुरुवारी खासदार विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नगर मतदारसंघातील प्रलंबित व नियोजित रस्ते आणि प्रशासकीय इमारतींच्या कामांचा विखे यांनी आढावा घेतला़ या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गो. श. मोहिते, कार्यकारी अभियंता राऊत, ए़ बी़ चव्हाण, ए़ एन राजगुरु आदी उपस्थित होते़.
दरम्यान, शासन अनेकदा लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही तीन दिवसांपूर्वी उड्डाणपुलाच्या आढावा बैठकीला महापौरांना बोलाविले तेव्हा त्यांना काम कोठे रखडले आहे, ते समजले जे काम एका फोनवर होणारे असते ते काम प्रशासनामुळे सहा महिने रखडले त्यामुळे यापुढे असे चालणार नाही प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन निर्णयप्रक्रियेत सहभागी करुन घेतले पाहिले प्रशासन काम करते अन् लोकप्रतिनिधी चोर आहेत, असे नाही आम्हाला लोकांनी लोकांच्या कामासाठी निवडून दिले आहे प्रशासनाकडून कामं करुन घेणं ही आमची जबाबदारी आहे आतापर्यंत लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्यामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींना विचारलं जात नाही, हे आता बंद झालं पाहिजे, अशा शब्दात खासदार विखे यांनी प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

