Share

विना परवानगी मिरवणूक प्रकरणी वसमतमध्ये आमदार, खासदारांसह पाचशे शिवप्रेमींवर गुन्हा दाखल

Published On: 

हिंगोली :  जिल्ह्यातील वसमत येथे मागच्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व्हावा अशी शिवप्रेमींची मागणी होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती गठीत करून समितीच्या माध्यमातून लोकवर्गणीतुन महाराजांचा पंचधातून बनविलेला अश्वारूढ १४ फूट उंचीचा पुतळा जयपूर येथील कारागिरांकडून बनवून घेतला आहे. शिवरायांचा पुतळा वसमत येथे दाखल झाला असता शिवप्रेमींच्या वतीने महाराजांचे ढोल ताशे डीजे लावून जंगी स्वागत करीत मिरवणूक काढण्यात आली होती.

या मिरवणूकीला गर्दी जमवित विना परवानगी मिरवणूक काढल्याने वसमत पोलीस ठाण्यात आमदार, खासदारांसह पाचशे शिवप्रेमींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या मिरवणुकीला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. पण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती आणि लोकप्रतिनिधींनी यावेळी पोलिसांच्या नोटिसांना न जुमानता गर्दी जमवित कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केले होते.

यावरून १४ ऑक्टोबर गुरुवार रोजी उशिरा छत्रपती शिवाजी महाराज समितीचे सर्व सदस्य, तसेच समितीचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील, आमदार राजू नवघरे, शिवसेनेचे माजी मंत्री डॉ जयप्रकाश मुंदडा, सर्व पक्षाचे उपस्थित स्थानिक पदाधिकाऱ्यांसह पाचशे शिवप्रेमींवर वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथ रोग प्रतिबंध कायदा १८९७ कलम २ तसेच जिल्हाधिकारी यांचा आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, गर्दी जमविल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!