Share

अभिनेत्री स्मिता तांबेने पहिल्यांदाच केले ग्लॅमरस फोटोशूट

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा:  चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबेने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलंय. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त अभिनेत्री स्मिता तांबेला पहिल्यांदाच ग्लॅमरस रूपात ह्या फोटोशूटमूळे पाहायला मिळतंय.

ह्या फोटोशूटवेळी स्मिता तांबे म्हणाली, “मी गेल्या दहा-बारा वर्षात अशा पध्दतीने स्वत:चे फोटोसेशन केले नाही. ज्या-ज्या भूमिका रंगवत गेले त्या-त्यावेळी सिनेमातल्या भूमिकेनुसार, पोस्टरसाठीच केवळ फोटो काढले आहेत.. हयाशिवाय मी कधी ग्लॅमरस भूमिका न रंगवल्याने माझे कधी ग्लॅमरस फोटोशूट माझ्या चाहत्यांसमोर आले नव्हते.”

स्मिता तांबेच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात २०१९ मध्ये अनेक नव्या गोष्टी घडतायत. त्याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, “हो, यंदा वर्षाच्या सुरूवातीला माझं लग्न झालं. आणि त्यानंतर आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडले. मी व्यावसायिक रंगभूमीवर खूप वर्षांनी इडियट्स नाटकाव्दारे परतले. सावट सिनेमाद्वारे निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवलं. डिजीटल विश्वातही पदार्पण झाले. आणि आता माझ्या एका मागोमाग एक तीन वेबसिरीज येतायत. त्यात बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतही खूप चांगले प्रोजेक्ट्स करतेय, ज्यांची लवकरच अनाउन्समेंटही होईल.”

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!