औरंगाबाद : पेट्रोल डिझेल सह गॅस व गोडे तेलाच्या किंमतीमध्ये भरमसाट वाढ झाल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे सोमवारी (दि.७) शहरातील विविध पेट्रोल पंपांवर आंदोलन करण्यात आले. महागाई कमी करण्यात केंद्रातील मोदी सरकार अपयशी ठरले असून वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे अशा प्रकारे निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जालना रोडवर राज पेट्रोल पंपावर जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी इतर नऊ ठिकाणी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र काळे किरण डोणगावकर, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, माजी तालुकाध्यक्ष रामराव शेळके, माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप, इक्बालसिंह गिल इत्यादींची उपस्थिती होती. बाबा पेट्रोल पंप, चुन्नीलाल पेट्रोल पंप, दिल्ली गेट पेट्रोल पंप, क्रांती चौक पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन पेट्रोल पंप, उस्मानपुरा पेट्रोल पंप, अंबरवाडीकर पेट्रोल पंप, सेव्हन हिल पेट्रोल पंप या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
करमाड येथे केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. मोदी बस करा जनतेची लूटमार, स्वस्त झाले मरण महागले पेट्रोल-डिझेल, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकारचे करायचे काय खाली मुंडके वर पाय, इंधन दरवाढ करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी झळकावलेले मोदींचे चित्र असलेल्या आणि महागाईचा भस्मासुर असा उल्लेख केलेला फलक लक्षवेधी ठरत होते.
महत्त्वाच्या बातम्या
- लॉकडाऊननंतर औरंगाबादच्या ‘स्मार्ट’ बसने मारला पुन्हा स्टार्टअप
- औरंगाबादसह हिंगोली मधील म्हाडाच्या सदनिकांची गुरूवारी ऑनलाईन सोडत
- ‘फक्त मराठा आरक्षणच नाही तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतही केंद्राने प्रयत्न करावा’
- गंगापुरात अधिकारी-कर्मचारी गैरहजर, कार्यालयाचा झाला पंचनामा
- अनलॉकच्या दुसऱ्या दिवशी पुण्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यात किंचित वाढ !

