Share

अखेर पोलीस शिपाई परचंडे यांच्या कुटुंबियांना मिळाली मदत

Published On: 

सोलापूर – कोविड 19 अनुषंगाने कर्तव्य बजावत असताना मृत झालेले पोलीस शिपाई रामेश्वर गंगाधर परचंडे यांच्या कुटुंबियास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

कर्तव्यावर असताना परचंडे यांचे 22 मे 2020 रोजी निधन झाले होते. त्यांच्या परिवारास पोलीस महासंचालक कार्यालयाकडून कोविड -19 प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत विशेष सहायता निधी मंजूर झाला होता. तो निधी पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते परचंडे यांच्या पत्नी नम्रता परचंडे, आई सुमन परचंडे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर आदी उपस्थित होते.

दरम्यान, भरणे यांनी सोलापूर शहरातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्राधान्याने काम करा असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि उपचार यातील कालावधी कसा कमी करता येईल यावर भर द्या. राज्याच्या टास्क फोर्समधील डॉ. दिलीप कदम यांनी नुकतीच सोलापूर शहराला भेट दिली आहे. त्यांनी सोलापुरातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याबाबत काही सूचना दिल्या आहेत.

गृहमंत्र्यांनी जवानांच्या तब्बेतीची केली विचारपूस; साधला ‘डिजिटल संवाद’

सीमेवर कोरोना रोखणा-या सरपंच उपसरपंच पोलिस पाटलांचा प्रमाण पञ देवुन सन्मान

‘राज्यात कोरोनामुळे मृत्यू कमी झाले आहेत याचं फडणवीस-दरेकरांना वाईट वाटत आहे’

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!