Share

शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव मिळायलाचं हवा : अमोल कोल्हे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडले. यात त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव मिळायलाचं हवा, अशी मागणी लोकसभेत केली आहे. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांच्या संदर्भातील प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

लोकसभेतील भाषणावेळी त्यांनी आपण अर्थव्यवस्था बळकटीचे स्वप्न पाहत आहोत परंतु दुसरीकडे शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. कारण ६५ टक्के शेतकरी त्यांच्या शेतमालासाठी किमान आधारभूत किंमत मिळावी म्हणून वाट पाहत आहे. त्यांच्या मालाला योग्य तो हमीभाव मिळावा आणि त्यांना न्याय द्यावा अशी मागणी कोल्हे यांनी केली. तसेच आयात आणि निर्यात ही शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि त्यांच्या हितासारखी असली पाहिजे, असंही कोल्हे म्हणाले.

दरम्यान, ज्यावेळेस शेतकऱ्यांचा कांदा बाजारपेठेत आणण्यासाठी तयार होता. तरीही सरकारला इजिप्त आणि पाकिस्तानातून कांदा आयात करण्याची गरज नव्हती कारण सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे कोल्हे यांनी नमूद केले.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!