Share

आता ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शिकेचा बंगला केला सील

Published On: 

मुंबई: राज्यातील कोरोनाचा कहर हा काही कमी होत नसल्याचे आकडेवारी वरून दिसून येत आहे. राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांपर्यंत कोरोना पोहोचला आहे. २ दिवसांपूर्वी बॉलिवूड चे शेहनशाह मानल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांचे सर्व बंगले सील करण्यात आले होते. तर ज्येष्ठ अभिनेत्या रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षकाला कोरोना झाल्यामुळे पालिकेने त्यांचा देखील बंगला सील केला होता.

आता बातमी आहे की बॉलिवूड दिग्दर्शक झोया अख्तर यांचा बंगला पालिकेने सील केला आहे.बॉलिवूड दिग्दर्शक झोया अख्तर यांचा बंगला रेखाच्या बंगल्याच्या शेजारीच आहे. दोन्ही बंगले जवळजवळ असल्याने महापालिकेने दक्षतेसाठी कारवाई केली आहे. अद्याप झोया अख्तर किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली नाही.रेखाच्या अगोदर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी स्टाफला कोरोना असल्याच्या बातम्या आल्या आहेत. यानंतर कलाकारांनादेखील क्वारंटाईन व्हावे लागले आहे.

गुणपत्रिकांवर नसेल ‘तो’ शिक्का; कृषीमंत्री दादा भूसेंच विद्यार्थी आणि पालकांना आश्वासन

अलीकडेच स्वत: आमीर खानने आपल्या कर्मचार्यांना कोरोना असल्याचे सांगितले होते. अमीर खान याने याबद्दल खुलासा केला होता कि, “माझे कुटुंब, घरामधील बाकीचे कर्मचारी आणि माझीही कोरोनाची चाचणी घेण्यात आली, जी नकारात्मक झाली आहे. परंतु आम्ही अजूनही खबरदारी घेत आहोत. मला आणि माझ्या कुटुंबीयांकडून बीएमसीचे आभार, ज्याने आम्हाला मदत केली आणि आम्हाला मार्ग दाखविला. सर्व सुरक्षित रहा,” असे आवाहन देखील त्याने केले होते.

रिअलमीने भारतात आणला नवीन ‘स्वस्त’ स्मार्टफोन

तर, अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन या दोघांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांना किमान आणखी सात दिवस तरी रुग्णालयात राहावं लागणार आहे”, अशी माहिती रुग्णालयाने ‘पीटीआय’शी बोलताना दिली. तर ऐश्वर्या राय बच्चन व आठ वर्षीय आराध्या यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

‘या’ जिल्ह्यात होणार पुन्हा एकदा लॉकडाऊन,कडक अंमलबजावणी करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!