Share

फडणवीसांचा विश्वासू आमदार कोरोनाच्या विळख्यात, मुलालाही झाली कोरोनाची लागण

Published On: 

लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे भाजपचे औसा येथील आमदार अभिमन्यू पवार व त्यांचा मुलगा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

संतापजनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान ‘राजगृह’वर तोडफोड

अभिमन्यू पवार यांच्या घशात खवखव होत होती. ही कोरोनाची लक्षणं असल्यानं त्यांनी कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. चाचणीनंतर ते कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं. स्वतः अभिमन्यू पवार यांनी ही माहिती दिली आहे, त्यांनी यासंदर्भात काही ट्विट केले आहेत.

दरम्यान, मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केलेली.मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पाॅजीटीव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत. अस अभिमन्यू पवार पवार यांनी सांगितल आहे.

तर, लातूर मधील आरोग्य व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच लातूर येथेच पुढील उपचार घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. आम्हा दोघांचीही तब्येत उत्तम असून काळजीचे काहीही कारण नाही. एक नम्र विनंती आहे, मागच्या ४-५ दिवसांत माझ्या वा परिक्षीतच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घ्यावे तसेच खबरदारी म्हणून कोरोना चाचणीही करून घ्यावी. असे आवाहन देखील पवार यांनी केले आहे.

कोरोना वॅक्सिन चाचणीसाठी संघ स्वयंसेवकांने केले देहदान !

दरम्यान, काही महत्त्वाचे काम असल्यास मी मेसेजच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आपण सर्वांनीच स्वतःची व कुटुंबियांची‌ काळजी घ्यावी. तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने लवकरच बरा होऊन जनसेवेत रूजू होईल असा विश्वास आहे. असे देखील पवार यांनी ट्विट करून सांगितले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!