Share

कोरोना वॅक्सिन चाचणीसाठी संघ स्वयंसेवकांने केले देहदान !

Published On: 

दुर्गापुर : ३ महिन्यांहून अधिक काळ कोरोना महामारीने जगभर थैमान घातले असून या रोगावरील लस शोधण्यात सर्वच देशांना अपयश येत होते. मात्र काही दिवसांपूर्वी आईसीएमआर ने कोरोना वरील प्रभावी लस शोधल्याचा दावा केला असून याची मनुष्यावरील चाचणीसाठी आता तयारी सुरु केली आहे.

आईसीएमआर आणि भारत बायोटेकने कोरोना व्हायरस रोखण्यासाठी को-वॅक्सिन ची निर्मिती केली आहे. या वॅक्सिनची लॉंचिंग १५ ऑगस्टला केली जाईल अशी स्पष्टता केली जात आहे. आज (७ जुलै) पासून या वैक्सीनची मानवावर ट्रायल केली जाणार आहे. यासाठी पश्चिम बंगालच्या दुर्गापुर येथील शिक्षक चिरंजीत धीवर यांनी या ट्रायलसाठी देहदान करण्याची ईच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आईसीएमआरने जाहीर केले कि या ट्रायलसाठी त्यांची निवड केली आहे.

‘टिकटॉक प्रो’फेक लिंकपासून सावध रहा ! सरकारचं आवाहन

चिरंजीत राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. संघाकडून प्रेरित होऊन मानव सेवेसाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे सांगितले. आईसीएमआर द्वारा कोरोनाबाधित व कोरोना लागण नसलेल्या निरोगी व्यक्तींवर ट्रायल केली जाणार आहे. दरम्यान, देशात कोरोना बाधितांचा आकडा ७ लाख पार गेला आहे.

याआधी देखील संघातील स्वयंसेवकांनी विविध शहरात स्वयंस्फूर्तीने अनेक नागरिकांची स्क्रिनिंग व चाचणी करण्यात आली होती. तर काही भागात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे अंतिम संस्कार देखील केले गेल्याचे व्हायरल झाले होते. एकूण कोरोनाबाधित संख्येमध्ये भारताने रशियाला मागे टाकले असून काल दिवसभरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा देखील अमेरिकेच्या पुढे गेला होता.

धनंजय मुंडे कोरोना ब्रेकनंतर पुन्हा बॅक टू वर्क

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!