Share

PCMC- पर्यावरण संवर्धनासाठी महापौरांचा पुढाकार!

Published On: 

पिंपरी-चिंचवड – महापालिकेच्या हद्दीमधून पवना व मुळा नदी वाहत आहे. मात्र, या नदीपात्रात जलपर्णीने साम्राज्य निर्माण केले आहे. त्यामुळे पर्यावरण विभागाने जलपर्णी कायमस्वरुपी हटविण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, असे आदेश महापौर नितीन काळजे यांनी दिले आहेत.
                 इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्या. आमदार महेश लांडगे आणि महापौर नितीन काळजे याबाबत सकारात्मक पुढाकार घ्यावा. आळंदीला गतवैभव प्राप्त करुन द्यावे, पिंपरी-चिंचवड महापालिका आगामीकाळात आळंदीकरांसाठी शुद्ध पाणी देईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्द्धीवर्ष सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली होती. त्यापार्श्वभूमीवर महापौर नितीन काळजे यांनी महापालिका पर्यावरण विभागाचे अधिका-यांची बैठक घेवून तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.
महापालिका हद्दीतील पवना आणि मुळा नदीपात्रात जलपर्णी वाढली आहे. त्यातच शहरातून निर्माण होणारे प्रदूषित पाणी, उद्योगधंद्यांचे रसायणमिश्रीत सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीपात्रात सोडले जाते. परिणामी, नदीपात्राजवळील लोकवस्तीत डासांची पैदास वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला साथीच्या रोगाचा धोका निर्माण होत आहे. त्याबाबत महापौर नितीन काळजे यांनी पर्यावरण विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, जलनिस्सारण चे अभियंता श्री दुधेकर , पर्यावरण चे उपअभियंता मनोहर जावरणी उपस्थित होते.
   याबाबत महापौर नितीन काळजे म्हणाले की, शहरातील पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महापालिका पर्यावरण विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. जलपर्णी, नदी प्रदूषणावर प्रभावी तोडगा काढण्यात यावा. यासह प्लॅस्टिक पिशवीची संपूर्ण बंदी करण्यात यावी, कचरा प्रक्रिया, शहरातील स्वच्छता, कचरा डेपोचा व कचरा विघटनाचा वाढता प्रश्न, ई- कच-याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. तसेच, शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची संख्या वाढवणे, राज्यातील महत्त्वाकांक्षी ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाचे काम मार्गी लावणे, प्रभागनिहाय कचरा उचलण्याची यंत्रणा सक्षम करणे, शहरातील मोठी रुग्णालये, मोठ्या हाउसिंग सोसायटी यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सक्षम करुन दुबईच्या धर्तीवर जलशुद्धीकरुन दैनंदिन खर्चासाठी त्या पाण्याचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षाही महापौर काळजे यांनी व्यक्त केली.
—————
कामाचा लेखी अहवाल द्या- महापौर
सध्या उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिका उद्यान व पर्यावरण विभागाने पाणी बचतीबाबत कोणत्या उपाययोजना केल्या. पर्यावरण संवर्धनाबाबत पर्यावरण विभागाने कोणकोणत्या उपाययोजना केल्या? त्याला प्रतिसाद कसा मिळाला? यापुढे प्रशासन कोणत्या प्रकल्पांवर काम करणार आहे? त्याचा शहराला काय फायदा होणार? याचा इत्यंभूत लेखी अहवाल सादर करावा. तसेच, उद्यान व गाड्या धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरू नये, असे आदेश महापौर नितीन काळजे यांनी पर्यावरण विभागाला दिले आहेत

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!