मुंबई : एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचेनेते होते. परंतू त्यांनी अचानक भाजप पक्षासोबत युती करत शिवसेना पक्षातुन काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केलं. तेव्हापासून शिवसेना पक्षामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली असून, शिंदेगट आणि ठाकरे गट असंं चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना का सोडली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे शिवसेना पक्षातून का बाहेर पडले हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य –
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाला नेहमीच विरोध केला. त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीशी शिवसेनेच्या नेतृत्वाने युती केली होती. त्यामुळे या विचारांपासून आम्ही फारकत घेतली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे एका वृत्तवाहिनीला मुलाखल देत होते. त्यावेळी ते बोलत असल्याचं समजतं आहे.
भाजपसोबत आमची नैसर्गिक युती आहे.-
पुढे एकनाथ शिंदे असं म्हणाले की, भाजप आणि आमची नैसर्गिक युती आहे. भाजपबरोबर युती केल्यानं सामान्य नागरिक तसेच शिवसैनिक समाधानी आहेत. पक्ष वाढविणे हे नेतेमंडळींपासून सामान्य कार्यकर्त्यांचे एकमेव उद्दिष्ट होते. त्यादृष्टीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षात बारकाईने लक्ष देत होते. 17 वर्षाचा असल्यापासून मी शिवसेनेत काम करत आहे. सगळं आयुष्य शिवसेनेसाठी खर्च केलं असताना, अशा वेळी मी शिवसेना सोडण्याचा विचारही करू शकत नाही. तसे माझ्या मनातही कधी येणार नाही.
शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही-
तसेच,शिवसेना ही काही ठराविक लोकांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. बाळासाहेबांची शिवसेना वाढविण्यासाठीच आम्ही हा मार्ग पत्करला असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Elaichi Water Benefits | तुम्ही कधी इलायची चे पाणी प्यायला आहात का? कारण त्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे,जाणून घ्या!
- Diet In Dengue | डेंग्यू मधुन लवकर रिकवर होण्यासाठी आणि प्लेटलेट्स वाढवण्यासाठी ‘या’ गोष्टी फॉलो करा.. जाणून घ्या!
- Cars Comparison | एकाच प्लॅटफॉर्मवर असूनही टोयोटा हायरायडर मारुती ग्रँड विटार किती वेगळ्या आहेत.. जाणून घ्या!
- Narayan Rane । उद्धव ठाकरेंकडे बोलायला चांगले वाक्य नसतील तर मला फोन करावा; नारायण राणेंचा सल्ला
- Marathi Moive | कुठे गेला मराठी प्रेक्षक? जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी व्यक्त केला संताप


