Share

Eknath Shinde | “शिवसेना ही काही ठराविक लोकांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही”

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातुन काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिवसेना पक्षामध्ये एक मोठी दरी निर्माण झाली असून, शिंदेगट आणि ठाकरे गट असंं चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर सतत आरोप करत असतात. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे –

शिवसेना ही काही ठराविक लोकांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. बाळासाहेबांची शिवसेना वाढविण्यासाठीच आम्ही हा मार्ग पत्करला, असल्याचं म्हणत एखनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना चांगलंच फटकारलं आहे. एकनाथ शिंदे एका वृत्तवाहिनीला मुलाखल देत होते. त्यावेळी ते बोलत असल्याचं समजतं आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे असंही म्हणाले की, पक्ष वाढविणे हे नेतेमंडळींपासून सामान्य कार्यकर्त्यांचे एकमेव उद्दिष्ट होते. त्यादृष्टीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पक्षात बारकाईने लक्ष देत होते. परंतू, विद्यमान नेतृत्व आमदारांपासून सामान्य शिवसैनिकांच्या भावनेकडे दुर्लक्ष करीत होतं. केवळ घरात बसून मर्यादित काम करून भागत नाही.

तसेच, वयाच्या 17 व्या वर्षांपासून मी शिवसेना पक्षामध्ये सक्रिय काम करीत आहे. शिवसेना वाढविण्यासाठी त्याग केला. घराकडे दुर्लक्ष झालं. शिवसेना वाढली पाहिजे, हेच माझे एकमेव लक्ष्य असायचे. सगळं आयुष्य शिवसेनेसाठी खर्च केलं असल्याच देखील शिंदे यांनी या ठिकाणी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!