नवी दिल्ली : मंगळवारी(१२ ऑक्टो.) जी २० बैठकीत बोलत असतांना अफगाणिस्तान हा मूलतत्त्ववाद आणि दहशतवादाचे केंद्र होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
A unified international response based on UNSC Resolution 2593 is necessary to improve the situation in Afghanistan.
— Narendra Modi (@narendramodi) October 12, 2021
यावेळी बोलतांना अफगाणिस्तानातील स्थिती सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठराव २५९३ वर आधारित एकत्रित आंतरराष्ट्रीय प्रयत्नांची गरज आहे, असेही ते म्हणाले. तसेच अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकारची स्थापना करण्याच्या आवश्यकतेवरही मोदी यांनी भर दिला. इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून जी २० परिषदेचे आयोजन केले आहे.
दरम्यान, परिषदेतील भाषणानंतर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘अफगाणिस्तानातील नागरिकांना मानवी दृष्टीकोनातून तातडीने विनाव्यत्यय मदत पुरविण्याचे आवाहन आपण केले आहे.’
महत्वाच्या बातम्या
- राज्यपालांच्या हस्ते ‘वेब नागपूर’ वेबसाईटचे लाँचिंग
- ‘महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली’, राजनाथ सिंह यांचा दावा
- ‘पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात मुलीची निर्घृण हत्या होणं सामाजिक अध:पतनाचं लक्षण’
- पुण्यातील कब्बडीपटू मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलीस कोठडी
- ‘अजित पवारांनी सही केलेला कागद दाखवणार’, किरीट सोमय्यांचा दावा


