Share

‘एनसीबीला गांजा आणि तंबाखूमधला फरक समजतो की नाही?’ नवाब मलिक यांचा सवाल

Published On: 

मुंबई : एनसीबी ही देशातील एवढी मोठी तपास संस्था आहे, त्यांच्याकडे अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरात आहे. तरीही त्यांना तंबाखू आणि गांजा यातील फरक करता आला नाही असा आरोप राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. एनसीबीकडून लोकांना बदनाम करण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांचे जावई समीर खान यांच्या अटक प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपावरून पर्दाफाश केला.

मलिक म्हणाले की, माझ्या जावयाकडे कोणत्याही प्रकारचा गांजा आढळून आला नाही. जावयाकडे हर्बल तंबाखू सापडल्याचे न्यायालयाच्या ऑर्डरमध्ये दिसत आहे. त्यामुळे एनसीबीला हर्बल तंबाखू आणि गांजा यातील फरक कळतो की नाही? या प्रकरणात माझ्या जावयाला फ्रेम करण्यात आले आहे. याविरोधात माझा जावई हायकोर्टात जाणार असल्याचेही मलिक यांनी सांगितले.

एनसीबीच्या कारवाईत दोनशे किलो गांजा मिळाला नाही. साडेसात ग्रॅमचा गांजा फर्निचरवालाकडे मिळाला. बाकी सर्व गोष्टी हर्बल टोबॅको आहेत हे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्य आहे. अशा संस्थांकडे इन्स्टंट लेव्हलला टेस्ट करण्याचे किट्स असतात. गांजा नसतानाही लोकांना फ्रेम करण्यात आलं. हे मी सांगत नाही तर कोर्टाचा रिपोर्ट सांगत आहे. २७ अ हे कलम लागू होत नाही. जो काही खटला फर्निचरवाल्यावर लागतो. पण त्याला लगेच जामीन दिला. हर्बल तंबाखू सापडल्यानंतरही लोकांना फ्रेम केलं जात आहे. सिलेक्टिव्ह खबर लिक करून लोकांना बदनाम करण्याचं काम एनसीबीकडून सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केला.

‘१२ जानेवारीला रात्री १० वाजता आपले जावई, समीर खान यांना ईडीचे समन्स आले आणि १३ तारखेला सकाळी १० वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आले. याची माहिती माध्यमांना आधीच देण्यात आली होती. तसा मेसेज त्याच नंबर वरून करण्यात आला होता. त्यामध्ये समीर खान हे ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पसरवली जात होती. या बनावट प्रकरणात आपल्या जावयाला अटक करण्यात आले. तसेच जावयाला आठ महिने तुरुंगात राहावे लागले. त्यामुळे मुलीला धक्का सहन करावा लागला असेही मलिक यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!