🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात मोठे राजकीय भूकंप पहायला मिळाले होते. शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी राष्ट्रवादीत तर राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होती. यामध्ये भारती पवार यांनी महाले यांचा दारूण पराभव केला. दरम्यान, आता धनराज महाले घरवापसी करणार आहेत.
धनराज महाले हे माजी खासदार हरीभाऊ महाले यांचे पुत्र आहेत. २००९ साली ते दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. परंतु २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. महाले यांनी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. ऐनवेळी युती झाल्यानंतर दिंडोरी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. त्यामुळे महाले यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रावादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र तरीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनराज महाले स्वगृही परतत आहेत. त्यामुळे शिवसेनेला दिंडोरी मतदारसंघात तगडा चेहरा मिळणार असला तरी राष्ट्रवादीला धक्का समजला जात आहे. महाले आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करा :फडणवीस
‘पूरग्रस्तांना मदत करताना जाहिरातबाजी करणे हा अत्यंत घृणास्पद प्रकार’
१, २ नव्हे तब्बल १० आमदारांनी केला भाजपमध्ये प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

