Share

‘सगळा भाजप झटला तरी धनुभाऊ मागे नाही हटला’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : परळी विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला आहे. भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा लाजीरवाणा पराभव झाला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा दणदणीत विजय झाला आहे. धनंजय मुंडे यांनी बहिण पंकजा मुंडे यांचे आव्हान स्वीकारत विजय संपादन केला आहे.

परळी विधानसभा मतदारसंघात यंदा हाय होल्टेज लढत पाहिला मिळणार आहे, अशी चर्चा होती. मात्र धनंजय मुंडे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी मिळवत विजय संपादन केला आहे. परळी विधानसभा मतदारसंघात शेवटच्या टप्यात भावनिक राजकारण पाहायला मिळाले. मात्र यावेळेस परळीच्या जनतेने भावनेला न भूलता निर्णायक कौल दिला आहे.

परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. तर सावरगाव येथे झालेल्या दसरा मेळाव्याला अमित शहा यांनी येऊन पंकजा मुंडेंच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. तरी देखील पंकजा मुंडे यांचा पराभव ते टाळू शकला नाहीत. त्यामुळे ‘सगळा भाजप झटला तरी धनुभाऊ मागे नाही हटला’ अस म्हंटल तर वावग ठरणार नाही.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष सुरू केला आहे. परळीत जेसीबीतून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळायला सुरूवात केली होती. दुसरीकडे पंकजा यांच्या घराबाहेर मोठा शुकशुकाट पाहायला मिळतोय.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1187290814570827776?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1187287663268679680?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!