Share

ना थके कभी पैर, ना कभी हिम्मत हारी है… सर्वोच्च न्यायालयाच्या दिलास्यानंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. तसेच, धनंजय मुंडे यांच्यावर दाखल केलेल्या बर्दापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यालाही स्थगिती देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणत ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे, तसेच ना थके कभी पैर… ना कभी हिम्मत हारी है… जज्बा है परिवर्तन का ज़िंदगी में… इसलिए सफर जारी है, अशी शब्दात त्यांनी भावना व्यक्त केली आहे.

जगमित्र साखर कारखान्यासाठी जमीन खरेदी करताना सरकारी जमिनीचे बेकायदा हस्तांतर करून घेतल्याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शासकीय जमीन अनधिकृतपणे खरेदी केल्याचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात जाऊन पोहचले असतानाचं. धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, आज सकाळी अंबेजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये धंनजय मुंडें विरोधात ४२०, ४६८, ४६५, ४६४ आणि ४७१ कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!