टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपला लक्ष केले आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक, इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा प्रश्न प्रलंबित असतानाच भाजप सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता वाजपेयींचे तरी स्मारक पूर्ण करा, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईमध्ये जागतिक किर्तीचे भव्य स्मारक व्हावे, ही तमाम जनतेची इच्छा होती. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अरबी समुद्रात उभारण्याचे निश्चित केले होते. या स्मारकाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या शासनाने घेतल्या असून या स्मारकाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता. स्मारकाच्या कामाचे टेंडर काढण्यात आले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाच्या भूमिपूजन-जलपूजन देखील झाले होते. तरी देखील महाराजांच्या स्मारकाचे काम अद्याप पूर्ण होऊ शकले नाही.
याच पार्श्वभूमीवर मुंडे यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे. आधीचे काम प्रलंबित असतानाचं भाजप सरकारने आता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मारक उभारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता किमान वाजपेयी यांचे तरी स्मारक पूर्ण करा असा टोला मुंडे यांनी लगावला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

