टीम महाराष्ट्र देशा : धनगर आरक्षणावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला. धनगर आरक्षणाचा मुद्दा सभागृहात मांडला जाऊ नये यासाठी सत्ताधारी पक्षाकडून जाणीवपूर्वक गोंधळ घातला गेला, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
मुंबई उच्च न्यायालयात काल ( गुरुवार ) मराठा आरक्षणावर लागणाऱ्या अंतिम निकालाकडे संपूर्ण राज्य आणि देशाचे लक्ष लागले होते. काल ( गुरुवार ) मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय दिला. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. याचदरम्यान धनगर आरक्षणावरून धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधला.
विधिमंडळाच्या इतिहासात आज पाहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाकडून एखाद्या समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला गेला. अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. इतकेच नव्हे तर धनगर आरक्षणाचा मुद्दा सभागृहात मांडला जाऊ नये यासाठी जाणीवपूर्वक गोंधळ घातला गेला, यातूनच सरकारची नियत कळते. सरकाचे हे अशोभनीय वर्तन सभागृहाचा अपमान करत आहे, असेही मुंडे यांनी म्हंटले.
विधिमंडळाच्या इतिहासात आज पाहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाकडून एखाद्या समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा दाबण्याचा प्रयत्न केला गेला. धनगर आरक्षणाचा मुद्दा सभागृहात मांडला जाऊ नये यासाठी जाणीवपूर्वक गोंधळ घातला गेला. यातूनच सरकारची नियत कळते. सरकाचे हे अशोभनीय वर्तन सभागृहाचा अपमान करत आहे.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 28, 2019
याचबरोबर सत्ताधाऱ्यांची वर्तवणूक म्हणजे विधिमंडळाच्या प्रथेला लागलेला कलंक आहे. आज १६ मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा सभागृहात मांडला जाणार होता, त्याला बगल देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नाहक गोंधळ घातला. सभागृह तहकूब करायला भाग पाडले. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या या भ्रष्ट सरकारचा निषेध असल्याचेही त्यांनी म्हंटले.


