Share

देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे – धनंजय मुंडे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : पिककर्जाच्या बदल्यात बँक मॅनेजरने शेतक-याच्या पत्नीकडे केलेली शरीरसुखाची मागणी, ही बातमी एकूण तळपायाची आग मस्तकाला जात आहे. अशा सरकारचा कडेलोट केला पाहीजे, त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे हे रामराज्य नाही तर हरामांचे राज्य झाले आहे. अशा शब्दात विधानपरिषद विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांना चांगलच फैलावर घेतल आहे.

दरम्यान, मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक मॅनेजरने पिककर्ज मंजुर करण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. फिर्यादीवरुन बँक मॅनेजरवर अट्रोसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॅनेजरला सहकार्य करणाऱ्या शिपायावरही गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांना लक्ष केल आहे.

मलकापूर तालुक्यात उमाळी येथील शेतकरी गुरुवारी 14 जून रोजी सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत त्यांच्याकडे असलेल्या दोन एकर शेतीवर पिककर्ज मागणीसाठी पतीपत्नीसह गेले. सर्व कागदपत्रे जमा करून बँक मॅनेजरला पिककर्ज केव्हा मिळेल याबाबत विचारणा केली. बँक मॅनेजरने मोबाईल नंबर घेत मी कर्ज मंजुरीबाबत मोबाईलवर कळवितो असे सांगितले.

संतापजनक : पिककर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!