मुंबई : काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या ऑनलाइन बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीवेळी जीएसटी, देशाची आणि राज्यांची असलेली सद्याची आर्थिक स्थिती, जेईई-नीट परीक्षा तसेच लॉकडाऊन यासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच, केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपा विरोधात लढायचं कि घाबरून राहायचं हे ठरवण्याची गरज असून भक्कम भूमिका घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
विराट कोहलीच्या घरी हलणार पाळणा; चाहत्यांची अखेर ‘ती’ प्रतीक्षा संपली
उद्धव ठाकरेंच्या या अवाहनानंतर शिवसेनेचे राज्यसभा खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ” उद्धव ठाकरे कधीही आडपदडा ठेवून बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवं, हीच भूमिका त्यांनी मांडली. बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवं. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल” असा खोचक निशाणा देखील त्यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधला आहे.
महाविकास आघाडीमध्ये धुसफूस वाढली ; परभणीत शिवसेनेनेच फोडले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय


