🕒 1 min read
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबर समोर येत आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकल्यानंतर चाहत्यांना लागलेली नव्या पाहुण्याच्या आगमनाची चाहुल अखेर आता पूर्ण होत आहे.
‘आणि आता आम्ही तीन होणार, जानेवारी २०२१ मध्ये होणार आगमन’ अशा कॅप्शनसह अभिनेत्री अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात विराट कोहली, अनुष्का शर्मा हे प्रचंड खुश दिसत असून अनुष्काचे बेबी बम्प देखील नजरेत येते.
https://www.instagram.com/p/CEYZINOpd53/?utm_source=ig_web_copy_link
महाविकास आघाडीमध्ये धुसफूस वाढली ; परभणीत शिवसेनेनेच फोडले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय
विराट कोहलीनंतर भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करणाऱ्या अनेक खेळाडूंनी विराट कोहलीनंतर लग्न केले व त्यांना बाळ देखील झाले. मात्र, विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या चाहत्यांना यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागली. काही दिवसांपूर्वीच हार्दीक पांड्याच्या बायकोने गोंडस मुलाला जन्म दिला होता. यानंतर हार्दीक पांड्या आणि विराट कोहलीवर अनेक मीम्स व्हायरल झाले होते.
शरद पवार यांनी एक फोन केला तरी के. के. रेंजचा प्रश्न निकाली निघेल- बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

