अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढतच आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोना बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली असून अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. राहता तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमसह सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या ६० बेडच्या कोव्हिड हॉस्पिटलची सुरुवात उद्या शिर्डीत होत आहे.
यापूर्वी राहता तालुक्यातील नागरिकांसाठी आ.विखे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना टेस्ट केअर सेंटरसह ११४ बेडच्या कोव्हिड सेंटरची उभारणी करण्यात आली होती. परंतु कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या आणि गंभीर रुग्णांची ऑक्सिजन बेड अभावी होणारी धावपळ लक्षात घेऊन आ.राधाकृष्ण विखे पाटील व खा.सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने या नविन कोव्हिड रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील आरोग्य विभागाने या रुग्णालयाच्या उभारणीसाठी गतीने निर्णय प्रक्रिया राबविल्याने अतिशय कमी कालावधीत साई आश्रम फेस २ येथे ह्या कोव्हिड हॉस्पिटलची उभारणी झाली आहे. सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम हे या सेंटरचे वैशिष्ट्य आहे. या व्यतिरिक्त ३० ऑक्सिजन बेड आणि १० बेड अतिदक्षता विभागात कार्यान्वित करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
अहमदनगरमध्ये कंगनाचा कुठलाच चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; शिवसेनेचा आक्रमक!
अर्थव्यवस्थेवरुन लक्ष हटवण्यासाठी कंगणाला पुढं आणलं जात आहे- खा.अमोल कोल्हे

