Share

धर्मवीर संभाजी राजेंच्या जन्मदिनी शासकीय सुट्टी घोषीत करा : अनिकेत घुले

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन हे भारतीय युवकांसाठी प्रेरणादायक आहे. संभाजीराजे यांचे बलिदान पुढील पिढ्यांना स्फुर्ती देत रहावे, यासाठी धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्मदिवस हा शासकीय सुट्टी म्हणून घोषित करण्यात यावा, अशी मागणी युवासेनेचे मावळ तालुका प्रमुख अनिकेत घुले यांनी केली आहे.

धर्मवीर संभाजीराजे यांचा जन्मदिवसादिवशी  सुट्टी जाहीर करत विविध कार्याक्रमांचे आयोजन करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन आकुर्डी तहसील कार्यालयाचे नायब तहसिलदार विकी परदेशी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना युवासेनेचे मावळे तालुका प्रमुख अनिकेत घुले, जिल्हा समन्वयक रूपेश कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, महाराष्ट्र शासनाकडे या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी लवकरच आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या नेतृत्त्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयी निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिपादन प्रतिक्षा घुले व निलेश हाके यांनी दिली आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!