Share

धोका वाढला : दौंडचे भाजप आमदार राहुल कुलही अडकले कोरोनाच्या विळख्यात

Published On: 

पुणे : कोरोनाने जगभर थैमान घातलं आहे. पुण्यात देखील दिवसेंदिवस कोरोंच्या रुग्णात कमालीची वाढ होत आहे. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याचे भाजपचे आमदार राहुल कुल यांना कोरोनाची लागण झाल्‍याचे समोर आले आहे. राहुल कुल यांनी स्वतः याबाबत आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून ही माहिती दिली आहे.

यंदाचा गणेशोत्सव “आरोग्योत्सव” म्हणून साजरा करू, महापौरांचे नागपुरकरांना आवाहन

दरम्‍यान, आमदार राहुल कुल यांच्या कुटुबियांची देखील तपासणी करण्यात आली आहे. यात सर्व कुटुंबियांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याची असल्याची माहिती राहुल कुल यांनी दिली आहे.

आमदार राहुल कुल यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना तपासणी करून घेतली होती. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही असा संदेश त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला दिला आहे.

‘स्वतःला महाराज समजणारे इंदुरीकर इतके खोटे बोलत असतील यावर विश्वासच बसत नाही’

राहुल कुल याआधी राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ते आमदारपदी निवडून आले. त्यांच्या पत्नी स्मिता कुल यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध भाजपकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!