Share

‘स्वतःला महाराज समजणारे इंदुरीकर इतके खोटे बोलत असतील यावर विश्वासच बसत नाही’

Published On: 

अहमदनगर : महिलांचा अपमान केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांना कायदेशीर नोटीस पाठवली यावर उत्तर देताना इंदोरीकर महाराज यांनी आपण असं बोललोच नसल्याचा दावा केला आहे. देसाई यांनी इंदोरीकर महाराज यांच्या समर्थकांकडून अपमानास्पद वागणूक आणि धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी इंदोरीकर महाराज यांना थेट कायदेशी नोटीस बजावली. यानंतर इंदोरीकर महाराज आणि तृप्ती देसाई यांचे समर्थक आमनेसामने आले आहेत.

‘सारथी’च्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये – सचिन सावंत.

माझे कोणी समर्थक नाही. अज्ञात लोकांनी तृप्ती देसाई यांना धमकी दिली असेल तर त्यास मी जबाबदार नाही. कीर्तनातून महिला अपमानित होतील, अंधश्रद्धा पसरेल असे वक्तव्य आजपर्यंत कधीच केलेले नाही, असे निवृत्ती महाराज देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

इंदोरीकर महाराज यांनी कीर्तनातून अंधश्रद्धा पसरविणारे वादग्रस्त वक्तव्य केले होते. महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करीत जाहीररित्या अपमान केला, असा आरोप करीत या मुद्यावरून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ऍड. मिलिंद पवार यांच्यामार्फत 26 फेब्रुवारी रोजी कायदेशीर नोटीस बजावली होती. महिलांची जाहीर माफी मागावी व पुन्हा अशी टिप्पणी करणार नाही, असे जाहीर करावे, अशी मागणी देसाई यांनी नोटीशीद्वारे केली होती. या नोटिशीला इंदोरीकर महाराज यांनी त्यांचे वकील ऍड. डॉ. मिलिंद साळुंखे यांच्यामार्फत ऍड. पवार यांना उत्तर दिले आहे. देसाई यांनी केलेले आरोप या नोटीसद्वारे इंदोरीकर महाराज यांनी फेटाळून लावले आहेत.

यावर आता तृप्ती देसाईंनी प्रतिक्रिया दिली आहे. मी महिलांचा अपमान कधीही केलाच नाही, त्यामुळे मी महिलांची माफी मागणार नाही,तो मी नव्हेच असे इंदुरीकर यांनी उत्तर देऊन हात वर करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच इंदुरीकर यांच्या समर्थकांनी तृप्ती देसाई यांची बदनामी केली होती तसेच ठार मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या त्यावर सुद्धा इंदुरीकर यांनी त्या समर्थकांना मी ओळखत नाही, माझे कोणीही समर्थक नाही असे उत्तर देऊन समर्थकांना सुद्धा तोंडघाशी पाडले आहे. अस तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार – अशोक चव्हाण

परंतु महिलांचा कीर्तनातून वारंवार अपमान करणे, अपशब्द वापरणे, कीर्तनातून अंधश्रद्धा पसरवणे त्याचे सर्व व्हिडिओ आमच्याकडे उपलब्ध असून त्या पुराव्यांच्या आधारे पुढील लढाई आम्ही पुणे न्यायालयात लढणार आहोत. स्वतःला महाराज समजणारे इंदुरीकर इतके खोटे बोलत असतील यावर विश्वासच बसत नाही, असा थेट हल्ला तृप्ती देसाई यांनी केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!