🕒 1 min read
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या १५ व्या हंगामापूर्वी झालेल्या मेगा लिलावात अनुभवी क्रिकेटपटू सुरेश रैनाची विक्री झाली नाही. हे पाहून त्याचे चाहते खूप निराश आणि आश्चर्यचकित झाले. मेगा लिलावादरम्यान, अनेक वर्षे चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुरेश रैनाला विकत घेण्यात कोणत्याही फ्रेंचायझीने स्वारस्य दाखवले नाही. आता चेन्नई फ्रँचायझीचे सीईओ काशी विश्वनाथन यांनीही याचे कारण दिले आहे.
सुरेश रैनाला आयपीएलचा भरपूर अनुभव आहे. या टी- २० लीगमध्ये त्याने २०५ सामने खेळले असून १ शतक, ३९ अर्धशतकांच्या मदतीने त्याने ५५२८ धावा केल्या आहेत. गुजरात लायन्स संघाचे कर्णधारपदही त्यांनी सांभाळले आहे. कोरोना व्हायरसमुळे त्याने २०२० च्या हंगामातून माघार घेतली. मागील हंगाम त्याच्यासाठी खास नव्हता आणि त्याने १२ सामने खेळले ज्यात त्याने १ अर्धशतकाच्या मदतीने एकूण १६० धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्जचे सीईओ काशी यांनी फ्रँचायझीने जारी केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे की, “रैना १२ वर्षांपासून सीएसकेसाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांपैकी एक आहे. अर्थात, रैनाला खरेदी न करणे आमच्यासाठी खूप कठीण होते, परंतु त्याच वेळी तुम्ही हे देखील समजून घेतले पाहिजे की संघाची रचना त्या संघातील फॉर्म आणि खेळाडूंवर अवलंबून असते.”
ते पुढे म्हणाले, “फॉर्म आणि कॉम्बिनेशन हे एक कारण आहे. तो या संघात बसणार नाही असे आम्हाला वाटले. चेन्नई संघाला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॅफ डू प्लेसिसचीही उणीव भासेल. प्लेसिस २०११ पासून संघाकडून खेळत आहे आणि गेल्या वर्षी त्यांच्या विजेतेपदाच्या मोहिमेचा भाग होता. फॅफ यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करणार आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- IPL AUCTION 2022: ‘हे’ मोठे खेळाडू आहेत कोलकता नाईट रायडर्सचा संघाचा भाग
- IPL AUCTION 2022: दिल्लीची ‘नवीन टोली’ स्पर्धा करणार काबीज
- IPL AUCTION 2022: पंजाब किंग्सचा संघ करणार नव्याने सुरुवात!
- IPL AUCTION 2022: आता राजस्थाचा नवीन संघ ‘हल्ला बोल’ करणार!
- IPL AUCTION 2022: आगामी हंगामासाठी ‘या’ संघासह होणार हैद्राबादचा सनराईस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
