Share

धैर्यशील मानेंचा भीमाशंकर पाटलांना इशारा, तर गाठ शिवसेनेशी आहे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात भीमाशंकर पाटील यांनी आक्षेपार्ह आणि बेताल वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी पाटील यांचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला, तर गाठ शिवसेनेशी आहे, असा इशारा धैर्यशील माने यांनी दिला आहे.

भाषावार प्रांतरचनेवेळी कर्नाटकात अडकलेल्या सीमाभागातील मराठी भाषिक आणि हा लढा तेवत ठेवणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असे वादग्रस्त विधान कर्नाटक नवनिर्माण सेनेचे स्वयंघोषित अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले होते.

‘मागील ६४ वर्षांपासून महाराष्ट्रात विलीन होण्यासाठी कायदेशीररित्या आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात बेजबाबदार, बेताल वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांना मी सांगू इच्छितो “कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसं, याचे उदाहरण घालून देऊ” असा इशारा धैर्यशील माने यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.

‘आजवर महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करलेले आहे. भीमाशंकर पाटील यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी तसे सांगावे, आजही महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी निधड्या छातीने गोळ्या झेलायला लाखो उभे राहतील, पण कर्नाटकातील वंचितांना महाराष्ट्रात आणण्यास आम्ही कटिबद्ध आहोत हे ध्यानात ठेवावे.’ असं धैर्यशील माने यांनी बजावलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!