Share

…तर भारतात डिसेंबरमध्ये येणार कोरोनाची लस, कोट्यावधी डोस बनवून तयार

Published On: 

मुंबई : दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत, वडगाव बुद्रुक पासून वॉशिंगटन पर्यंत सगळे जण एकच प्रश्न विचारात आहेत की कोरोनावर लस कधी येणार. आता याच कोरोनावर लस तयार करण्याचं काम ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरु आहे. या लशीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आहेत. ही लस यशस्वी झाली तर जगाला मोठा दिलासा मिळणार आहे. भारतात या लशीचं उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये केलं जाणार आहे. सीरम इन्स्टिट्युटकडून लस बनवण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्युटचे कार्यकारी संचालक राजीव ढेरे यांनी दिली आहे.

सुरुवातीला कोणतीही लस बल्कमधे (मोठ्या प्रमाणात ) बनवली जाते. त्याप्रमाणे ही लस देखील बल्कमधे बनून तयार आहे. आणखी काही प्रक्रिया झाल्या की ही लस बाटल्यांमधे भरणे सुरु करणार आहोत. या लसीच्या भारतीय लोकांवरही चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होईल. 1500 भारतीय लोकांवर या चाचण्या करण्यात येणार आहेत, असं राजीव ढेरे यांनी सांगितलं.

हे ‘अमर-अकबर-अँथनी’चं सरकार भाजपरुपी खलनायकाचा नक्कीच नाश करेल…

ऑक्सफर्ड विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांकडून सुरु असलेले प्रयोग, भारतातील पंधराशे लोकांवर सुरू असलेल्या चाचण्या आणि कायदेशीर सोपस्कार नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होतील. त्यामुळे डिसेंबर महिन्यात किंवा थोड्या पुढच्या काही दिवसांमध्ये ही लस लोकांना उपलब्ध होऊ शकते. कदाचित ही लस इंग्लंडमध्ये सुरुवातीला थोडीशी आधी उपलब्ध होऊ शकते. पण आपल्याकडे या लशीचे कोट्यावधी डोस आम्ही बनवून तयार ठेवत आहोत. त्यामुळे ती सगळ्यांना लगेच उपलब्ध होईल. मी शास्त्रज्ञ आहे आणि आतापर्यंत ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या प्रयोगाची प्रगती पाहता आपण कोरोना लसीच्या 90 ते 95 टक्के जवळ पोहोचलो आहोत, असा दावा राजीव ढेरे यांनी केला आहे.

आनंदाची बातमी : राज्यात आज रेकोर्डब्रेक ७ हजार १८८ रुग्ण ठणठणीत बरे होऊन परतले घरी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!