Share

मध्यवर्ती बसस्थानकावर आता कोरोना चाचणी 

Published On: 

औरंंगाबाद : शहर आणि जिल्हा परिसरात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाय योजना करण्यात येत आहे. मध्यवर्ती बस्थानकात मनपा प्रशासनाच्या वतीने बुधवार (दि.२४) पासून कोरोना चाचणी सेंटर्स उघडण्यात आले आहे.

ज्या प्रवाशांना कोरोना चाचणी करायची आहे त्यानी करावी ज्यांना करायची नाही त्यांना मात्र कुठल्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांना कुठल्याही पकारचे घाबरण्याचे कारण नाही. बसमधून प्रवास करतांना मात्र प्रवाशांनी आपल्या तोंडाला मास्क बांधणे अत्यंत गरजेचे आहे. अशी माहिती आगार प्रमुख एस.ए. शिंदे यांनी दिली.

गेल्या काही दिवसापासून शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी शासनामार्फत विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. एक दिवसापूर्वीच शहर परिसरात मंगळवार पासून येत्या ८ मार्च पर्यत शहरात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी आता विविध स्तरावर प्रशासनाकडून पाऊल उचलेले जात आहे.

बुधवार पासून मध्यवर्ती बसस्थानकावर धुळे प्लॅटफामॅ समोर कोरोना चाचणी सेंटर उघडण्यात आले आहे.या कोरोना चाचणी सेंटरवर ज्या प्रवाशांना कोरोनाची चाचणी करायची आहे त्यांना करता येईल मात्र ज्यांना कोरोना चाचणी करून घ्यायची नाही त्यांना कुठल्याही प्रकारची सक्ती केली जात नाही. एसटी बस मधून प्रवास करणाड्ढया प्रवाशांना मॉस्क हा सक्तीचा करण्यात आला आहे. तसेच एसटी महामंडळाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह चालक – वाहकांना ही मॉस्क लावणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!