औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून वेळेवर वेतन मिळत नसल्याची ओरड मागील अनेक वर्षांपासून होत आहे. वेतन प्रणालीतील अनागोंदीमुळे शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी होती. हा प्रकार थांबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांनी महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करण्यासाठी प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर करून अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली आहे. सीईओंनी सोमवारी (दि. १८) जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे या संदर्भातील आदेश काढले आहेत.
जिल्ह्यात जिल्हा परिषद, प्राथमिक शिक्षण विभागात ९ हजार शिक्षक कार्यरत आहेत. तालुकानिहाय त्यांचे विभाजन असून गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या वेतन प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. मागील अनेक वर्षांपासून शिक्षक संघटनां वेळेवर वेतन करण्याची मागणी करत आहे. परंतु या वेतनप्रणालीत तांत्रिक अडचणीमुळे सुरळीत होऊ शकलेली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी गटने यांनी शिक्षकांना दरमहा १ तारखेस वेतन अदा करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
मुख्याद्यापक ते मुख्य अधिकारी आदींची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न आतातरी सुटेल अशी अपेक्षा शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षात शिक्षकांच्या वेतनासाठीचा संघर्ष वाढतांना दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात वेतन वेळेवर होत नसल्याने अनेकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. मात्र आता नव्या सीईओंकडून वेतन प्रणालीबाबत घेण्यात येणाऱ्या नव्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कशाप्रकारे होते यावर वेतनाबाबत सर्व काही अवलंबून आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षांसाठी निरीक्षक म्हणून उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
- ‘वर्ध्यातील जलसंधारणामुळे 2 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली तर 6 गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले’
- शेतकऱ्यांसाठी भाजप किसान मोर्चा करणार आक्रोश आंदोलन
- फडणवीसांच्या नेतृत्वात साखर कारखानदारीचा अनुभव असलेले महाराष्ट्रातील नेते अमित शाहांना भेटणार
- ‘माणिके मगे हिते’ फेम योहानीची बॉलिवूड एण्ट्री फिक्स…!

