🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : येत्या विधानसभा निवडणुकीत नुकतेचं भाजपात आलेले राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देयची यावरून कॉंग्रेस पक्षात चर्चा सुरु आहे. मात्र आता राधाकृष्ण विखे पाटील यांना शह देण्यासाठी कॉंग्रेस महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे या तरुण उमेदवाराला उमेदवारी देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. तसेच या मतदारसंघात विखे पाटील एकदाही पराभूत झाले नाहीत. आता पर्यंत तब्बल २५ वर्ष विखेंनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे विखेंच्या या बालेकिल्ल्यात विखेंचा शह करण्यासाठी कॉंग्रेसने देखील जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर सत्यजित तांबे या उमद्या नेत्याला विधानसभा निवडणुकीच्या उतरवणार आहेत, अशी चर्चा आहे.
विखे आता भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसकडे विखेंशी बरोबरी करणार उमेदवार नसल्याचे बोलले जात होते. मात्र आता विखेंच्या विरोधात सत्यजित तांबे यांना रिंगणात उतरवण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. विशेष म्हणजे तांबे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. त्यामुळे मामा-भाचे मिळवून विखेंच्या गडाला सुरुंग लावणार असल्याचं दिसत आहे.

सत्यजित तांबे यांनी युवक कॉंग्रेसमधून काम करत असताना अनेक आंदोलन केली आहेत. सरकार विरोधात त्यांनी आवाज उठवला आहे. तसेच आंदोलने करणारा तरूण नेता आणि आक्रमक नेतृत्व अशी तांबे यांची ओळख आहे. त्याचबरोबर तांबे यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

