Share

दिल्लीतून विधानसभेचे उमेदवार लादू नका, कॉंग्रेस नेत्यांची मागणी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर आता कॉंग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात येत आहे, मुंबईमध्ये या संदर्भात बैठक बोलवण्यात आली असून राज्यातील प्रमुख नेते, आमदार आणि पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत. यामध्ये विधनासभा निवडणुकीत दिल्ली वा मुंबईतून उमेदवार न लादता स्थानिकांना एकमताने उमेदवार निश्चित करू द्यावे, अशी जोरदार मागणी कॉंग्रेस नेत्यांनी केली आहे.

दादर येथील टिळक भवन येथे कॉंग्रेसच्या राज्यव्यापी बैठकीला गुरुवारी सुरुवात झाली, भाजपकडून देवेंद्र फडणवीस तर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करण्यात येत आहे, त्यामुळे कॉंग्रेसने देखील स्वच्छ प्रतिमेच्या नेत्याचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

दरम्यान, पक्षाची स्थिती बिकट बनली असून आता तरी नेत्यांनी एकमेकांतील गटबाजी थांबवा, अशी विनंती जेष्ठ कॉंग्रेस नेत्यांनी केली आहे.

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!